
संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : १७ ओक्ट : २०२० : नागपूर : जगात चांगले रस्ते बनविण्यामागे यातायात चांगली झाली पाहिजे व लोकांना चालण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. परंतु जगात विख्यात असलेली ऑरेंज सिटी नागपुरात करोडोच्या लागतीत बनवलेली सिमेंट रस्ते वाहन चालकांसाठी नाही तर ते रस्ते वारंवार तोडन्यासाठी बनवल्या गेलेली आहेत काय ? मनपा, पीडब्ल्लूडी,ट्रैफिक विभाग, महावितरण, जलपूर्ती विभाग यांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याकारणाने नवीन रस्त्याना नाली , ड्रेनेज लाईन, विजलाईन, केबल लाईन पसरविण्याच्या नावाने तोडले जात आहे. जो आम नागरिक आपल्या दिवस रात्रच्या मेहनतीच्या पैशाने इमानदारीने टॅक्स भरून त्यांच्या पैश्याचा असा दुरुपयोग होत आहे, प्रशासन ते पैसे बरबाद करीत आहेत. कोणताही विभाग असो, कंपनी असो कुठेही रस्ते खोदायला सुरुवात करतात परंतु संबंधित प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करीत नाही. कोणत्याही कामाला घेऊन ट्राफिक आणि मनपा च्या विभिन्न विभाग मध्ये कोणतीही ताळमेळ नाही, किंबहुना नियोजन नाही. याचा खमियाजा आम नागरिकाला आपले जीव देऊन गमवावा लागतो. आम नागरिकांचे म्हणणे आहे कि कोणते काम केव्हा आणि किती कालावधीत झाले पाहिजे हे सांगायला काय उच्च नायालयला रोड वर यावे लागेल.
मानकापूर रिंग रोड, मानेवाडा रिंग रोड, कळमना रोड, नंदनवन सिमेंट रोड, शताब्दी चौक रोड, हिंगणा रिंग रोड, सोबत असे कित्येक रोड आहेत कि जेथे सध्या रोड चे सिमेंटीकरण झालेले आहे, परंतु या मार्गावर बनवलेले सिमेंट रोड तोडून नळ लाईन, केबल लाईन, आणि ड्रेनेज लाईन चे काम चालू आहे. काही दिवस अगोदर प्रताप नगर चौकात केबल लाईन टाकण्याकरिता कांक्रीट रोडला तोडण्यात आले. या आधी नाला बनविण्याकरिता छत्रपती चौकाच्या समोर सिमेंट रोड तोडल्या गेला. या व्यतिरिक्त अजून कित्येक रोड चे मुख्य मार्ग तोडले गेलेले आहेत, याची कल्पना प्रशासनाला नाक्कीची असेल. या उपरांत सुद्धा कोणत्याही ठेकेदारावर / अधिकाऱ्यावर कोणतीच कार्यवाही होत नासल्याने म्हणजे या शासनाची नपुसंकता दिसते आहे. नियमानुसार पाहिले असंता कोणत्याही ठेकेदाराला रस्ते खोदण्यासाठी मनपाच्या बांधकाम विभागाची स्वीकृती घ्यावी लागते, या साठी कंपन्यायानं काही पैसे डिपोजीत करावे लागते, परंतु स्वीकृतीची हि व्यवस्था फक्त आणि फक्त कागदावरच असते. वास्तविकते मध्ये या नियमावर कोणताही ठेकेदार अंमल करीत नाही. प्रत्येक ठेकेदार आपल्या मरर्जीने वाटेल तिथे खड्डा खोदतो आणि आपले काम करून लोक मेले पाहिजे यासाठी खड्डा खोदून ठेवतो. काम झाल्या नंतर कित्तेक महिन्यापर्यन्त गदधा विझविल्या जात नाही. याच अंतराळात कित्तेक वाहन चालक खड्यात पडून आपले हात पाय तुडवतात, आणि कित्तेक मृत्यूमुखीसुद्धा पडताट, याचे एकमेव कारण म्हणजे खड्डे वीजविण्यात लापरर्वाही केली जाते. गट्टू लावून ठेकेदार रोड लेवल करण्यासाठी आपले पैसे आणि वेळ वाचविण्यासाठी कांक्रीट मिक्सर फैलावून निघून जातात त्यामुळे रोडची लेवल वरखाली होते, खालच्या दर्जाच्या ह्या कामामुळे लोकांचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता वाढते. त्यानंतर आणखी त्याच जागेवर खड्डे निर्माण होऊन लोकांचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता वाढते.
नागपुरात अजून असे काही रोड आहेत कि त्या रोडवर कित्तेक तक्रारी करून सुद्धा रोड चे काम झाले नाहीत , गैरेज – बुधवार बाजार रोड कपिल नगर नागपूर-२६ हा रोड आसि नगर झोन मध्ये पडतो , बऱ्याच वर्षापासून या रोड असवैधानिक पद्धतिने वाहणाची ये जा आणि ट्रक्स पार्कीगच्या पद्धतिने यांची अवैधरितीने ठेवले गेले आहेत तसेच रोडची हालत वेन्टीलेटर वर ठेवल्या रोग्याप्रमाणे आहे बरीच दा कंपलेट करूनही शासन या रोडकडे दुलक्ष करित आहे याचा प्रश्न इथल्या रहिवाश्यांना पडला आहे . रोड वरून मातीचे कण ऊडून प्रात्येकाच्या घरात आपले वास्तव्य करिात आहे . धुडिने इथल्या रहिवाश्यावर आक्रमण केले आहे त्यामूळ त्यांची तब्येतीवर परिणाम होऊन ते आजारी पडले आहे NMC Commisioner यांनी या साईड वर येवून पाहणी करावी अशी इथल्या लोकांची मागणी आहे . बाईक सवार दररोज येथे घसरूण पडतात. कित्येकांचे हातपाय तुटले आहेत.
अशा प्रकारचे अचानक कोणताही रोड वर खोदकाम चालू केल्याने तिथले यातायात प्रभावित होते .मनपा आणि ट्रैफिक विभाग लोकांना कोणतीही सूचना देत नाही, आणि आपसात नियोजन सुद्धा करीत नाही. कोणतेही कार्य निर्माणाशी संबंधित चालू करण्यापूर्वी त्या मार्गाची जाणकारी तिथल्या लोकल लोकांना दिली पाहिजे, प्रशासन फक्त सिव्हिल लाईन्स, सीताबर्डी, वेस्ट हायकोर्ट रोड, असे पाश एरियात येत्यात संबंधित सूचना देते परंतु अन्य ठिकाणी निर्माण कार्याची लोकांना कोणतीच माहिती नसते.