
संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : ६ सप्टेंबर २०२० : सार्वजनिक बांधकाम विभाग विशेष प्रकल्प नागपूर यांनी नाबार्ड अर्थसाहाय निधीतून वर्ष २०१४-२०१५ , ग्रामीण पायाभूत विकास निधी -२०१९ या निधीतून , सार्वजनिक बांधकाम विभाग विशेष प्रकल्प नागपूर , ” पारशिवनी तालुक्यातील मास्तर -माहुली – सालई- बिटोली रस्त्यावर इ . जी . मा . – १२६ पेंच नदीवर मोठ्या बुडीत पुलाचे बांधकाम ” या शीर्षकाखाली, रुपये १२२०. लक्ष खर्च केले. या कामाचे कंत्राट मेसर्स अजयपाल मंगल , ठाणे यांना देण्यात आले. या कामाचा करारनामा क्रमांक सी / १/ डी एल / २०१४-१५ असा आहे.काम सुरु करण्याचा दिनांक ०१/०१/२०१५ आहे, आणि कामाची कालावधी ३०/०६/२०१६ होती. हे काम त्या कालावधीत पूर्ण झाले.
महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना आणि नागपूर चे पालक मंत्री बावनकुडे असताना , तसेच मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्या छत्रछायेखाली हा पूल बांधण्यात आला, तेव्हा त्यांच्या काळआत सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूरचे अधिकारी वर्गही फार माजले होते. कारण ते लोकांच्या कोणत्याही समस्सेकडे लक्षच देत नव्हते. या काळात भ्रष्ट्राचाराला फार मोठा पूर आला होता. याच काळात हा पूल म्हणजे २०१८ ला हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आणी या वर्षी म्हणजे २९/३० ऑगस्ट २०२० ला हा पूल कोसडला असताना पावसानी या अधिकाऱ्यांची पोल खोलून त्यांची वास्तविकतेचा भ्रष्ट्राचारची उघडबांगडी केली. एव्हढेच नव्हे तर या २९/३० ऑगस्ट २०२० पाऊस आणि त्यातच धरणातील पाणी सोडल्याने त्याचा फटका पूर्व विदर्भाला बसला. हजारो एकर मधील पीक नष्ट झाले, घरे वाहून गेली तसेच सुमारे २५ कोटी रुपयांचे रस्ते व पूल उध्वस्त झाले असा अंदाज आहे . पारशिवनी विभागात कार्य करणारा डेप्युटी इंजिनेर वासनिक स्वतःला फार मोठा इमानदार इंजिनीअर आहे असा भ्रम उत्पन्न करतो. आणि आता आपणच बघा या इमानदार इंजिनियरची करतूद .पारशिवनी तालुक्यातील माहुली – सालई – बिटोली दरम्यान असणारा मोठा पूल पाण्याने वाहून गेला. २६० मीटर लांबीचा पूल अतिवृस्तीमुळे नव्हे तर नीकृष्ट दर्जाचे मटेरियल आणि भ्रष्ट्राचाराला आव्हान करणार कृत्य होय यावरून हेच सिद्ध होते. अवघ्या काही वेळात पुलाचे आठ गाळे पाण्याने वाहून गेले. २०१५ साली बांधकाम सुरु केल्यानंतर २०१८ पासून वाहतूक सुरु झाली पुलाला १० मीटर चे २६ गाळे असून साडेअकरा मीटर रुंदी आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने असलेले ४०० मिलेटर लांबीचे जोड रस्तेही उध्वस्त झाले.
या पुलासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अन्य जिल्यातिल पूल आणि रस्ते हि वाहून गेले. याची चौकशी करण्यासाठी बांधकाम विभागाचें मुख्य अभियंता यांनी ताबडतोब दोषींना बडतर्फ करून चौकाशी केली पाहिजे पण तसे ना करता स्वतःहाच्या अध्यक्षेखाली सहसचीवला घेऊन उंचस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. संकल्प चित्र विभागाचे तसेच नागपूरच्या दक्षता व गुणनियंत्रक मंडळाचे अधीक्षक अभियंता सदस्य तर नवी मुंबई चे संकल्प चित्र पूल मंडळाचे अधीक्षक अभियंता सदस्य सचिव यांची समिती स्थापन केली आहे. या समितीती असा एकही कर्तव्यदक्ष अधिकारी असेल का कि ज्यांनी संपूर्ण आयष्यात कधी भ्रष्ट्राचार केला नसेल . असा प्रश्न येथील लोकल लोकांना पडला आहे. लोकांच्या झालेल्या नुकसान भरपाई चे हे जिम्मेदार असतील काय ? लोकांनी जे आपल्या टॅक्स मधून विदर्भाच्या प्रगतीसाठी पैसे दिलेत त्याची हि अशी विटंबना करणाऱ्याला हि समिती गजाआड टाकेल काय कि बस समिती म्हणून चायनास्ता आणि टेबल खालून घेऊन मामला रफादफन करणार यात लोकांना शंका उतपन्न झाली आहे .
नागपूर, चंद्रपूर, आणि गडचिरोलीत कश्तीगस्त पुरांची माहिती समिती घेणार आहे. पुलाच्या क्षतिग्रस्त होण्या मागची कारणे, भविष्यात अशा प्रकारची हानी टाळण्यासाठी उपाययोजना आणि संकलनाच्या पद्धतीत आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी समितीला दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या निमित्ताने भंडारा जिल्यात ३२ कीलोमिटर रस्ते, १५ पुलंना फटका बसला. गोंदिया जिल्यात ६ राज्य महामार्ग, ८ प्रमुख जिल्हा मार्ग उध्वस्त झाले ठिकठिकाणी खड्डे पडलेत , ८ पुलं क्षतिग्रस्त झालेत . खेरलांजी येथील वेइनगंगानदीवरील पूल क्षतिग्रस्त झाला. चन्द्रपूर जिल्हा येथील ८० किलोमीटर लांबीचे प्रमुख रास्ते व ३२ पूल पाण्याखाली असल्याने खराब झाले. आणि पोच मार्ग वाहून गेले. गडचिरोली जिल्यातील वडसा, आरमोरी, कोरची, आणि गडचिरोली या चार तालुक्यांना १८ रस्ते खराब झालेत,आणि पुलांची दुर्दशा झाली . तसेच रामटेक- मौदा रोडवर माथनी येथील कन्हान नदीवरील पूल क्षतिग्रस्त झाला, कामठी तालुक्यातील कुही-पाडेगाव-राजोरा, सोनेगांव – गादा रस्ता व नाल्या वाहून गेल्या. पारशिवनी तालुकतील गवातील पाली-उमरी पुलाचे जोड रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला.