नागपुरात खाद्यतेल भेसळ कांड: संजय पाटील

Fortune Sunlite Sunflower Refined Oil (15 Ltr.) Shop Grocery Online

संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : 17 जुलै 2020 : नागपूर: ब्रॅन्डेड खाद्यतेलाच्या डब्यात निकृष्ट प्रतीचे खाद्यतेल भरून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली. इतवारी येथील या खाद्यविक्रेत्याकडून १ लाख ३९ हजार ६४७ रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने शंकर ट्रेडिंग कंपनीवर छापा टाकून १ लाख ३९ हजार ६४७ रुपये किंमतीचा रिफाइन्ड सोयाबिन तेलाचा साठा जप्त केला. १५ किलोच्या टिनाच्या डब्यात निकृष्ट प्रतीचे तेल भरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर इतवारी येथील शंकर ट्रेडींग कंपनीवर छापा टाकण्यात आला. त्यात फॉर्च्युन, किंग्ज इत्यादी कंपनीचे बनावट लेबल लावून खाद्यतेलाचे टिन सीलबंद करून त्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. शंकर दुरूगकर यांच्या मालकीचे हे दुकान आहे.

रिफाइन्ड सोयाबिन तेल (फॉर्च्युन) : १९३.४ लिटर

रिफाइन्ड सोयाबिन तेल (किंग्ज) : ११५३.४ किलो

रिफाइन्ड सोयाबिन तेल (खुले) : ३५८.४ किलो
नमुने प्रयोगशाळेत
या साठ्यातून प्रत्येकी एक-एक नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रफुल्ल टोपले व विनोद धवड यांनी ही कारवाई केली.
इथे करा तक्रार
सणासुदीचे दिवस सुरू झाले असून या दिवसांत खाद्य पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढते. या भेसळीला रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी ०७१२-२५६२२०४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांनी केले आहे.

King's Soyabean Oil - Buy Soyabean Oil Product on Alibaba.com

खाद्यतेलात भेसळीचा धक्कादायक प्रकार पुढे आल्यानंतर या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. शहरातील इतर खाद्यतेल विक्रेत्यांचीही तपासणी होणार असून कुठून माल खरेदी केला जातो…, यात कोणकोणते विक्रेते सहभागी आहेत,… केव्हापासून हा भेसळीचा प्रकार सुरू आहे,… यांबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे.

आर्थिक गणित कसे जुळते?

अन्न व औषध प्रशासनाने १५ जुलै रोजी शंकर ट्रेडिंग कंपनीवर छापा टाकून १ लाख ३९ हजार ६४७ रुपये किंमतीचा रिफाइन्ड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. १५ किलोच्या टिनाच्या डब्यात निकृष्ट प्रतीचे तेल भरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. माहितीच्या आधारावर इतवारी येथील शंकर दुरुगकर यांच्या मालकीच्या शंकर ट्रेडिंग कंपनीवर छापा टाकण्यात आला. फॉर्च्युन, किंग्ज इत्यादी कंपनीचे बनावट लेबल व टिकली लावून खाद्यतेलाचे टिन सिलबंद करून त्याची विक्री केली जात असल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ उडाली.

भेसळीच्या या खाद्यतेलाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ते शहराच्या वेगवेगळ्या भागांत विकण्यात येत असल्याचे पुढे झाले. किराणा दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या या ब्रॅण्डेड खाद्यतेलांपैकी कोणता माल शुद्ध आणि कोणता अशुद्ध, हे समजणे ग्राहकांना शक्य नसल्याने आता हा संपूर्ण माल शोधून तो जप्त करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने पाऊल उचलले आहे. खाद्यतेल उत्पादन आणि विक्रीच्या या यंत्रणेत भेसळ करणारी मोठी यंत्रणा सक्रिय असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागातील सूत्रांनी सांगितले.

एक किलो तेल बनविण्यासाठी कमीत कमी अडीच किलो शेंगदाणे लागतात. शेंगदाणे १०० रुपये किलोप्रमाणे मिळतात, असे असताना १ किलो शेंगदाणा तेल १५०० रुपयांत कसे मिळते, तेलाचे आर्थिक गणित कसे जुळते, असा सवाल शेतकरी अभ्यासक अमिताभ पावडे यांनी उपस्थित केला. भारत मोठ्या प्रमाणात पाम तेलाची आयात करतो. मात्र, बाजारात पाम तेल ग्राहकांना मिळत नाही, त्यामुळे पाम तेल खाद्यतेलात मिसळत तर नाही ना, असा प्रश्नही पावडे यांनी उपस्थित केला.

Leave a comment